वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पॅनल तयार करून शिवाजी विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढणार..! – डॉ. क्रांती सावंत

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

दिनांक २५ ऑक्टोबर २०२२

शिवाजी विद्यापीठ हे नेहमीच वंचित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्राध्यान्य देणारे विद्यापीठ आहे. त्यामुळे अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडीने शिवाजी विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुक ‘वंचित बहुजन विद्यार्थी विकास आघाडी’ या पॅनल च्या माध्यमातू निर्णय यापूर्वीच घेतला असून पक्षाच्या वतीने मोठ्याप्रमाणात पदवीधर नोंदणी करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पक्षाचे गावस्तरावर संघटन असून कार्यकर्त्यांनी प्रत्येक सिनेट पदवीधर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून पक्षाचा विद्यार्थी विकास अजेंडा सांगावा असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राज्याकार्याकारिणी सदस्य डॉ. क्रांती सावंत यांनी व्यक्त केले. त्या इस्लामपूर येथे पदवीधर सिनेट निवडणूक बैठकीत बोलत होत्या.

यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर म्हणाले कि, विद्यार्थी हाच शिक्षण व्यावस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सर्वकांही त्याच्यासाठी असले पाहिजे. अलीकडील काळात वंचित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसमोर अनेक शैक्षिणिक प्रश्न उभे आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी ही शिवाजी विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीत वंचित हुन विद्यार्थी विकास आघाडी’ या पॅनल च्या माध्यमातून लढणार असून शिवसेना ठाकरे गटाच्या सोबत एकत्र येवून लढण्याच्या पर्यायाचा ही विचार आमच्यासमोर आहे.

बैठकीत कांही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या जिल्ह्यातील पोलिंग सेंटर च्या जबाबदाऱ्यांचे ही वाटप करण्यात आले. तालुका अध्यक्षांवर आपापल्या तालुक्यातील सिनेट पदविधर मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी देण्यात आली. बैठकीस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. विलास कांबळे, एस. आर. कांबळे, प्राचार्य साताप्पा कांबळे, मिलिंद पोवार, मिलिंद सनदी, मल्हार शिर्के, दयानंद भोसले, विद्याधर कांबळे, नितीन कांबळे, अमित नागटिळे, आकाश कांबळे, राजू मुलाणी, सुमेध माने, बाळासो कुशाप्पा आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सक्रीय सहभाग घेतला. यावेळी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *