



–
लोकदर्शन बदलापूर 👉(गुरुनाथ तिरपणकर)-
कोराना काळाच्या दोन-अडीज वर्षानंतर सर्वच सण-उत्सव अतिशय हर्षोत्सवात आनंदाने साजरे होत आहेत.सर्व सामान्य दीपावलीचा आनंद मनमुराद घेत आहेत.देशाच्या सीमेवरही मिठाई वाटुन आनंद साजरा केला गेला.त्याच अनुषंगाने देशाच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणाची आहुती देणा-या जवानांनाही बदलापूर येथील महालक्ष्मी तलाव गार्डन,शहीद स्मारकाजवळ दिपावलीच्या निमित्ताने एक दीवा प्रज्वलीत करून त्यांना आगळीवेगळी श्रध्दांजली वाहण्यात आली.”एक दीप शहिदोंके नाम”हा कार्यक्रम युनायटेड एक्स सर्व्हिस मेन असोशिएशनतर्फे दिपावलीत आयोजित करण्यात आला होता.सर्व उपस्थितांनी एक एक दीवा पेटवून आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी माजी नगरसेवक कीरण भाईर,असोशिएशनचे अध्यक्ष आबा बांदेकर,भोसले,सुरेशचंद्र,गोखले व इतर माजी सैनिक व मान्यवर नागरिक उपस्थित होते.