महात्मा फुले साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती

लोकदर्शन सासवड,👉राहुल खरात

दि. २० खानवडी (ता.पुरंदर) येथे १५ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथ दिंडी, संमेलन उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कथा कथन, कविसंमेलन, पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत,अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते ़

संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, दत्ताशेठ झुरुंगे. डाँ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर परिसंवाद होणार आहे,

संमेलनाचे संयोजन करण्यासाठी आयोजित बैठकीला राजाभाऊ जगताप,सुनील धिवार, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले , विजय तुपे, प्रा सुरेश वाळेकर, दिपक पवार, संजय सोनवणे आदी उपस्थित होते, साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक यांनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here