धानोली ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा

 

लोकदर्शन👉 मोहन.भारती

कोरपना – धानोली ग्राम पंचायत वर सलग दुसऱ्यांदा विजय संपादन करत भाजपने दणदणीत विजय संपादित केला. यामध्ये भाजप चे सहा तर जण काँग्रेस तीन उमेदवार विजयी झाले.
यात सरपंच पदासाठी वैशाली शंकर पेंदोर या निवडून आल्या
प्रभाग क्रमांक एक मध्ये ओमराज प्रल्हाद पवार , वंदना रामा मडावी , कविता अरुण जाधव ( तिन्ही भाजप )
दोन मध्ये सुदर्शन शामराव आडे, गंगाधर प्रभाकर राठोड , सीमा भगवान कोटनाके ( तिन्ही काँग्रेस ) तर
तीन मध्ये यादव मोहपतराव किंनाके , ज्योतिका तुळशीदास गेडाम, सुमन अशोक मंगाम ( तिन्ही भाजप)
यांनी विजय प्राप्त केला. भाजपच्या वतीने धानोली, तांडा एक , तांडा दोन या तिन्ही ठिकाणी विजय रॅली काढून विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद पवार
माजी सरपंच विजय रणदिवे, जंगा सोयाम, ज्योती मंगाम, सुरेश किंनाके , चंद्रभान कींनाके, पिराजी राठोड , दिगंबर राठोड, भिमलू जाधव, राम किशन मडावी, नारायण राठोड आदी सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here