सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोईर यांच्या वतीने नवघर स्मशानाच्या रस्त्यांची साफसफाई* *तर रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या वतीने स्मशानावर लाईटची सोय*

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 13 ऑक्टोंबर काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नवघर ग्रामपंचायतमध्ये स्मशानात रात्रीच्या अंत्य संस्कारा वेळी झाडे झूडपे गवतातून अंधारातून मार्ग काढत नवघर गावातील ग्रामस्थांना सदर मृत व्यक्तीवर अंत्य संस्कार करण्याची वेळ आली होती. या अंत्य संस्कार वेळी गवत झूडुपातून वाट काढत तसेच लाईटची व्यवस्था नसल्याने अंधारात वाट काढत अंत्य संस्कार करताना ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते.या समस्याची दखल घेत सर्वप्रथम नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोईर यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. मनोहर भोईर यांनी दोन मजुरांच्या सहाय्याने स्मशान भूमी परिसरातील गवत, झाडी झूडपे काढून परिसर स्वच्छ व सुंदर केला. येण्या जाण्याचा मार्ग मोकळा केला.तर मनोहर भोईर यांचे कार्य पाहुन सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ साहित्यिक रायगड भूषण एल बी पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून स्मशान भूमीत दिवाबत्तीची (लाईटची )व्यवस्था केली.सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोईर व रायगड भूषण एल बी पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून या दोघांचेही ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here