मराठी उद्योग सामाजिक संस्था आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगळावेगळा विक्री मेळावा चे आयोजन.

 

लोकदर्शन मुंबई 👉: महेश कदम

विरार – मराठी उद्योग सामाजिक संस्था आणि आश्रय फाऊंडेशन (रजी.) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१४/१०/२०२२, १५/१०/२२ ते रविवार १६/१०/२२ सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत पुर्ण तीन दिवस भव्य दिव्य असा आगळावेगळा विक्री मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने असे सांगण्यात येत आहे की या मध्ये दिवाळी फराळ खाद्य पदार्थासह कपडे, घरगुती वापरातील इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल लॅपटॉप एलई डी लाइट्स गॅसगिझर, असे मराठी उत्पादकांनी तयार केलेले कींवा वितरकांचे प्रोडक्ट बाजार भावा पेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत आणि विशेष म्हणजे टीव्ही, फ्रीज, वाॅशिगंमशीन, होमथेअटर सारखे मराठी उत्पादकांचे ब्रॅण्ड असलेले प्रोडक्ट बाजार भावापेक्षा कमी दरात चांगल्या सर्विसच्या हमीसह बजाज फायनान्स च्या माध्यमातून मासिक हप्त्याची सुविधा देखील देण्यात येणार आहे, संस्थेचे अध्यक्ष श्री. सुहास टावडे, पदाधिकारी सहदेव सावंत, बापू परब, विनायक सुर्वे, अनिल कदम यांनी सांगितले या मेळाव्याच्या माध्यमातून इच्छुकांना वितरक म्हणून व्यावसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच तिन दिवसात सर्वात जास्त रकमेची खरेदी करणार्या पहील्या तिन ग्राहकांना क्रमवार तिन आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे, प्रत्येक दिवशी एक लकी ड्रॉ काढुन लकी ग्राहकाला देखील एक आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मराठी ग्राहकांनी या मेळाव्याच्या माध्यमातून खरेदी करून मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे, अधीक माहिती साठी कृपया संस्थेशी संपर्क करावा अशी विनंती श्री.अनिल कदम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here