उरण वायु विद्युत केंद्रातील दुर्घटनेत विष्णू पाटील या ही कामगारांचा मूत्यू संतप्त ग्रामस्थांची गेटवर धडक

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि १० ऑक्टोंबर उरण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित ( वायु विद्युत केंद्र) उरण या प्रकल्पात रविवारी ( दि९) घडलेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत प्रकल्पातील बाँयलर प्रमुख प्रभारी विवेक धुमाळे यांचा जागीच मृत्यू झाला होता.तर प्रकल्पातील दुर्घटनेत गंभीर रित्या जखमी झालेले कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांचा उपचारादरम्यान सोमवारी ( दि १०) सकाळी मृत्यू झाला आहे.सदरची दुर्घटना रविवारी सुट्टीच्या दिवशी घडली, नाहीतर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती असे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी आणि ५० लाख रुपये भरपाई मिळावी यासाठी संतप्त ग्रामस्थांनी गेटवर धडक दिली आहे

वायु विद्युत केंद्र ( वेस्ट हिट रिकव्हरी प्लांट) उरण मध्ये गॅस टर्बाईन-८ हे युनिट १२० मेगावाट लोडसह सेवेत असताना रविवारी ( दि९) दु १२:३० वाजता अचानक त्यात तांत्रिक दोष उदभवून उच्च दाबाच्या बूस्टर पंपामधून गळती झाली.सदर प्रसंगी तिथे नजीक नियमित तपासणीसाठी कार्यरत असलेले बॉयलर प्रमुख प्रभारी- विवेक धुमाळे, बॉयलर तंत्रज्ञ- के.के. पाटील आणि कंत्राटी मदतनीस- विष्णू यशवंत पाटील हे तिघेही दुर्दैवाने या आकस्मिक अपघातात उच्च दाबाच्या वाफेमुळे या अपघातात गंभीररीत्या भाजले गेले.जखमींना तातडीने राष्ट्रीय बर्न सेंटर, ऐरोली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींपैकी विवेक धुमाळे यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर सध्यस्थितीत वरिष्ठ डॉक्टरांमार्फत आय.सी.यु मध्ये तातडीने उपचार सुरू असताना कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांचा सोमवारी ( दि१०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तसेच कुंदन कमळावर पाटील या जखमी कामगारांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकुती चिंताजनक आहे.तर डेस्क ऑपरेटर – प्रदीप सिंग, यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने त्यांना मात्र बेलापूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर व कार्य संचालक गिरीश कुमारवार यांनी इस्पितळात भेट दिली असून .
त्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वीज केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे पुढील कार्यवाही करत आहेत.

सदर प्रकल्पात चार गँस टरबाईज असून ८०५ मेगावाट वीज निर्मिती केली जाते. सदर प्रकल्पातील प्लांट हा आटो मेटीक आहे.सध्या या प्रकल्पात बॉयलर आपरेटर नाही.सेफ्टी अधिकारी तीन वर्षे नाही आणि जो सेफ्टी अधिकारी आहे.तो अनुभवी नाही तो शिकावू आहे.रविवारच्या दुर्घटनेमुळे ४५ मेंगावाट विज चा तुटवडा निर्माण झाला आहे.सदर दुर्घटनेत फक्त २५ लाखाच नुकसान झाले आहे.उत्तम दर्जाचे शिक्षण घेतलेला सेफ्टी अधिकारी हा एक वर्षानंतर प्रकल्पात येणार आहे.दुर्घटनेत मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती प्रकल्पाचे सुप्रिटेंडर इंजिनिअर एस.एल.वाघ यांनी पत्रकारांना दिली आहे

या घटनेचे गांभीर्य ओळखून कामगार नेते भुषण पाटील,रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,लक्ष्मण पाटील,संध्या ठाकूर,दर्शन घरत,सरपंच मानसी पाटील,शेखर पाटील, सुनील पाटील, महादेव घरत सह भेंडखळ, बोकडवीरा,फुंडे, डोंगरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी विष्णू यशवंत पाटील या सह इतर मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी आणि ५० लाख रुपये भरपाई द्यावी.अशी मागणी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ केली आहे.तसेच विष्णू यशवंत पाटील यांचा मुत्यू देह रुग्णवाहिकेव्दारे प्रकल्पाच्या गेट समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *