सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्रा. जहीर सैय्यद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदुर: जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे दरवर्षी कोरपणा, जिवती व राजुरा तालुक्यातील विवीध शिक्षण क्षेत्रात क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी वरील तिन्ही तालुक्यातील एकूण 22 शिक्षकांना हा पुरस्कार घोषित झाला. कनिष्ठ महाविद्यालय विभागातून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक जहीर सैय्यद यांना हा पुरस्कार दिला गेला.
प्रा जहीर सैय्यद सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात मागील 22 वर्षापासून कार्यरत असून
दरवर्षी व सुट्टीच्या दिवशी ते मुलांकरिता इंग्रजी बेसिक ग्रामरचे मोफत अतिरिक्त वर्ग घेतात त्यांच्या मार्गदर्शनातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विवीध क्षेत्रात यश संपादन केले आहे. तसेच ते “जहीर व्हॉईस” (Jahir Voice) या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे व्हिडिओ बनवतात. शैक्षणीक कार्यासोबतच प्रा जहीर सैय्यद हे सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर असतात. मागील काही दिवसापूर्वी 33000 के वी राजुरा फिडर च्या तारांचा शॉक लागून हात गमावलेल्या महिलेला मोबदला मिळण्याकरिता त्यांनी लढा दिला होता.
प्रा जहीर सैय्यद यांच्या शैक्षणिक, सामजिक कार्याची दखल घेऊन जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे त्यांना या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला गेला.
झोनल प्रेसिडेंट सौरभ बरडिया, जेसीआय अनूप गांधी, रजनी ताई हजारे, स्वतंत्रकुमार शुक्ला तसेच जेसीआय राजुरा रॉयल्स चे समस्त पदाधिकारी
या मान्यवरांच्या उपस्थितीत बल्लारशाह विश्राम गृहात पार पाडलेल्या दिमाखदार सोहळ्यात सर्व 22 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला.
प्रा जहीर सैय्यद यांच्या यशाबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गड चांदुर च्या समस्त पदाधिकाऱ्यांनी, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *