जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे. लाल बहादूर शास्त्री तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे. भारताचे दुसरे पंतप्रधान जय जवान जय किसान चे प्रणेते लाल बहादूर शास्त्री तथा अहिंसात्मक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती मोठ्या थाटामाटाने लखमापूर येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी लखमापूर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सत्यपाल पिंपळशेंडे , शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कु.उरकुडे मॅडम शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बंडू बुच्चे तथा शाळेतील सहाय्यक शिक्षक करतारसिंग अलावत . अंगणवाडी सेविका ठावरी ताई ,पिंपळशेंडे ताई, आवारीताई आणि शाळेतील विद्यार्थी जयंती सोहळ्यामध्ये उपस्थित होते.
जयंती प्रसंगी बंडू बुच्चे यांनी या प्रसंगी बोलतांना थोरांचे विचार अंगीकारून आपणही भविष्यामध्ये त्यांच्यापासून काही ना काही प्रमाणात तरी आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे कार्य करावे समाजाच्या हितासाठी समाज हितासाठी शाळेतून निघावं अशा प्रकारे मोलाचं मार्गदर्शन केलं. सोबतच शाळेतील सहाय्यक शिक्षक करतारसिंग अलावत यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून कठीण परिस्थितीमध्ये माणसाने कसं सावराव त्यातून आपला मार्ग कसा काढावा जीवनामध्ये अहिंसेतून खूप मोठे काम होऊ शकते, प्रेमाने जग जिंकता येते नैतिक मूल्यांची आठवण करून दिली.जीवनामध्ये ध्येय ठेवून कार्य करत राहावं.असे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ७ वी ची विद्यार्थिनी कु.योगिता भारत ढाकणे हिने केलं.
तर आभार प्रदर्शन यश महेंद्र चौधरी या विद्यार्थ्याने मानले.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व गावकरी उपस्थित होते
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here