उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला प्रारंभ करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 2 ऑक्टोंबर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला सुरवात करावी. या प्रमुख मागणीसाठी उरणच्या तहसिलदारांना 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमीत्ताने शांततेच्या मार्गाने उरण सामाजिक संस्थेने उरण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला सुरवात करावी. या मागणीसाठी उरणच्या तहसिलदारांना सदरचे निवेदन गांधी जयंतीच्या निमित्ताने उरण सामाजिक संस्थेने सादर केले आहे.

2011 मध्ये उरण तालुक्यात उपजिल्हा रुगणालय उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे.त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून उरण – पनवेल मार्गावरील
बोकडविरा येथील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहतीच्या पाठीमागे भूखंड ही देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे 57 कोटी रुपयांचा निधी ही मंजूर झाला आहे. तरीही उरण मध्ये रुग्णालयाच्या उभारणीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. उरणच्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेने गांधी जयंती निमित्ताने ही मागणी तहसिलदारांच्या वतीने राज्य सरकारकडे केली आहे.

उरण हा राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा तालूका असतांनाही येथील नागरिकांना उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई व पनवेल गाठावे लागत आहे. उरण मधील रुग्णांना नवी मुंबई 40 तर मुंबई 60 किलोमीटरवरचे अंतर पार करीत असतांना वेळीच उपचार न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उरण सामाजिक संस्था सन 2010 पासून तालुक्यात सुसज्ज रुग्णालय व्हावे या मागणीसाठी दरवर्षी गांधी जयंती निमित्ताने 2 ऑक्टोबर या दिवशी लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन , निदर्शने आदी मार्गांचा अवलंब करत आलेली आहे.

2011 च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत तत्कालीन आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे व त्याचा पाठपुरावा केल्याने उरणला शंभर खाटांचे उपरूग्णालय उभारण्यासाठी सिडकोकडून भूखंड मंजूर झाला आला. त्याची किंमतही देण्यात आली आहे. या प्रत्येक बाबतीत उरण सामाजिक संस्थेचा सहभाग महत्वपूर्ण ठरला असून, त्यामुळे उरणमधील नागरिकांच्या सुविधेसाठी रुग्णालयाची उभारणी लवकरात – लवकर करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी
उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष कॉ. भूषण पाटील, सिमा घरत , महिला आघाडी व सचिव संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली उरणचे नायब तहसिलदार जी.बी.धुमाळ यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *