गडचांदुरात पार पडला मुस्लिम विवाह परिचय मेळावा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर – मुस्लिम जमात गडचांदूरच्या वतीने लक्ष्मी मंगल कार्यालय गडचांदूर येथे मुस्लिम सामूहिक परिचय मेळावा नुकताच पार पडला. पहिल्यांदाच अशा प्रकारचा मेळावा घेण्यात आला असून एकूण २५ जणांनी मेळाव्यामध्ये परिचय दिला.
सदर मेळाव्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील मुस्लिम नागरिकांची उपस्थिती होती. परिचय मेळाव्यामुळे विवाह करणाऱ्यांना जोडीदार निवडण्यास मदत होईल असे कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रहुफ खान वजीर खान यांनी मेळाव्यादरम्यान म्हटले. यावेळी मंचावर सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रफिक निजामी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here