जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बैलमपूर येथे कॅच द रेन उपक्रम राबविण्यात आला.                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,बैलमपूर येथे नेहरू युवा केंद्र च्या वतीने कॅच द रेन हा उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक खामानकर,पवार,चव्हाण,शिंदे मॅडम,जिभकाटे मॅडम, नेहरू युवा केंद्र च्या प्रतिनिधी शुभांगी रत्नपारखी प्रामुख्याने उपस्थित होत्या.यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले व पाण्याचा सदुपयोग कसा करावा याबाबत माहिती दिली.तसेच गावात जनजागृती करणारे भित्तीपत्रके भिंतीवर लावण्यात आली.
कॅच द रेन या विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा सिडाम,द्वितीय क्रमांक संवेदना शंभरकर, तर तृतीय क्रमांक रजनी तेलतुंबडे यांनी पटकाविला, विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र शुभांगी रत्नपारखी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, गावकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here