राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारंभ.                                                              .

. लोकदर्शन 👉 राहुल खरात

जांभुळणी येथे 21 ते 27 मार्च, 2022 या कालावधीत कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 27 मार्च, 2022 रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभ, कला विज्ञान महाविद्यालय, आटपाडीचे प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होते. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून मुलांना बिघडवण्याऐवजी चांगले घडवण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात येत असतो’. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून, जांभळीच्या सरपंच, सौ. संगीताताई शिवराम मासाळ या उपस्थित होत्या. त्यानी ही श्रमदान व प्रबोधनाच्या माध्यमातून सात दिवस गावाची सेवा केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयांचे आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम, अधिकारी प्रा. भारती देशमुखे, प्रा. डॉ. बाळासाहेब कदम, प्रा. सचिन सरक, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे,
प्रा. नितीन सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सात दिवस राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सक्रिय भाग येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी, या कालावधीत त्यांना आलेले अनुभव कथन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार अजून 4 दिवसांनी पुढे वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सात दिवसाच्या कालावधीमध्ये श्रमदान कार्यक्रमांमध्ये आरोग्य उपकेंद्र परिसरातील काटेरी झाड तोडणे, शोष खड्डा, कंपोस्ट खत खड्डा काढणे, याच बरोबर मोफत प्राथमिक आरोग्य शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिर, घरगुती डॉक्युमेंटरी सर्वेक्षण याच बरोबर गावातील जनतेचे आरोग्य व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन ग्राम स्वच्छता या विषयी घरोघरी जाऊन प्रबोधन केले. प्रबोधनात्मक कार्यक्रमात आरोग्य, देश मोठा की धर्म..? रक्तक्षय मुक्त भारत, सांडपाणी व घन कचरा निर्मूलन, विधी साक्षरता, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे यांनी केले. आभार प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी मानले. कार्यक्रमास दिनेश वाघीरे, लक्ष्मी वाघीरे, स्वयंपाक करणाऱ्या महिला व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here