आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕तेलंगणा राज्यातील कवठाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन.

राजुरा :– तेलंगणा राज्यातील कवठाळा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि शिरपूर चे आमदार कोनेरी कोनप्पा यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष जयराम बोटपेल्ली, जिल्हाध्यक्ष वानु पाटील नरुले, उपाध्यक्ष दामोधर एकोणकर, कवठाचे झेड पी टी सी अनुषा डोंगरे, माधपेल्ली चे एम एम पी डुबय्या नानया, शिरपूर मंडल अध्यक्ष राजेंद्र बोरकुटे, मलय्या येलमुले, लहानचु पाटील चापले, वंदना मॅडम, सिध्दमसेठ्ठी सुहासिनी, वेंकट श्रीनिवास यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here