तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे* जितेंद्र बैस                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:-
ज्यांचे तारुण्य अजून उमलायचे आहे असे तरुण युवक आज व्यसनाच्या आहारी गेल्याने तरुणांनी व्यसनापासून दूर राहीले पाहिजे असे प्रतिपादन अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही समन्वयक जितेंद्र बैस यांनी केले ते शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर व आय एस ओ ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा निमणी येथे सुरू असलेल्या रासेयो शिबिरात व्यसनमुक्ती विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ माया मसराम अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही ट्रेनर धर्मेंद्र बेलोरकर उपसरपंच उमेश राजूरकर डॉ हिना झाडे ग्रामपंचायत सदस्या गिरजबाई गोबाडे सुनंदा टोंगे सरिता नगराळे शीला टोंगे आदी उपस्थित होते
पुढे बैस म्हणाले की व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते व विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होतो
नंतर कौशल्य विकास या विषयावर बेलोरकर यांनी सांगितले की कौशल्य विकासाच्या माध्यमातून वयक्तिक आणि सामाजिक विकास साधावा ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटून देशाला बळकटी मिळेल.
कार्यक्रमाचे संचालन रोहिणी चिकनकर तर आभार अंकित चन्ने यांनी मानले यावेळी रासेयो विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here