आशा सेविका या ग्रामीण भागातील आरोग्यदूत. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕गडचांदूर येथे आशा दिन उत्साहात संपन्न.

कोरपना :– राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोरपना आणि जिवती तालुक्यातील आशा सेवकांच्या सन्मानार्थ तालुका आरोग्य अधिकारी गडचांदूर यांच्या प्रांगणात आशा दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आशा सेविका या खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील आरोग्यदूत असून अनेक अडचणींवर मात करून आपले सेवाकार्य पार पाडीत आहेत. त्यामुळेच बालगोपालांचे आरोग्य उत्तम व सुदृढ राखण्यात मोठी मदत होत आहे. या प्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांचे तसेच आरोग्य विभागाने घेतलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सुध्दा करण्यात आले.
या प्रसंगी गडचांदूर च्या नगराध्यक्षा सविताताई टेकाम, कोरपना च्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे, नगरसेवक विक्रम येरणे, राहुल उमरे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. संजय घाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे, पाटण च्या डॉ. कविता शर्मा, मांडवा च्या डॉ. तरोने, डॉ. ताकसांडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रवी ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाला कोरपना, जिवती तालुक्यातील आशा सेवका व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here