गुरुकुल महाविद्यालयात शहीद दिन साजरा !

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 23 मार्च 2022 रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे शहीद दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण व पूजन करण्यात आले. याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन करनेवार, वाणिज्य विभागाचे डॉ. राजेश डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी आपण ज्या स्वतंत्र भारतात राहत आहोत, त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी जीवाची परवा न करता आपले सर्वस्व पणाला लावले, शहीदे आझम भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांचे कार्य महान आहे, त्यांच्या या महान कार्याला वंदन करून, त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर यांनी आपल्या मनोगतात शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी केलेल्या महान क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पुराणिक, आभार प्रदर्शन प्रा. सचिन करनेवार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. नानेश्वर धोटे., सुशांत खिरटकर , प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, शालिक कांबळे, ननिता बुरान, प्रशांत नवले व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here