राजुरा रोडवरील पेट्रोलपंप समोर ट्रकची दुचाकीला जबर धडक –

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕ एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

गडचांदूर :-
अंबुजा सिमेंट कंपनी मध्ये कार्यरत दोन कर्मचारी मंगळवारी सकाळी आठ वाजता कंपनीत मोटरसायकल ने आपल्या कामाला निघाले असता सना पेट्रोलपंप समोर समोरून येणाऱ्या ट्रकने (ट्रक क्रमांक TS 01 UC 0225 )दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे( वय 47) राहणार गडचांदूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संतोष पवार (वय 37)हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ट्रक ड्रायव्हर घटनास्थळवरून ट्रक सोडून फरार झाला, गडचांदूर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला,ट्रक ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करीत आहेत,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here