लंडन येथे उच्च शिक्षण घेऊन सूजात आंबेडकर भारतात परतले…


लोकदर्शन 👉 राहुल खरात
मुंबई
दि. २२ मार्च २०२२

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आद. सुजात आंबेडकर हे रॉयल हाॅलोवे विश्वविद्यालय, लंडन येथून निवडणूक व्यवस्थापन,निवडणूक प्रचार आणि लोकशाही या राज्यशास्त्राच्या विद्याशाखेत M.sc पूर्ण करून भारतात परतले आहेत. त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत आंबेडकरी जनतेने उत्साहाने केले यावेळी हजारो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. सुजात आंबेडकरांच्या आगमनामुळे युवा कार्यकर्त्या मध्ये आंनदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुजात आंबेडकरांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग नवीन पिढीच्या व वंचित समाजाच्या पारदर्शक राजकारणासाठी होईल असे जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here