विरूर स्टे. येथे दि. २० मार्चला धम्म आपल्या दारी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
*बुद्ध विहार, विरूर स्टेशन त. राजुरा जि चंद्रपूर येथे रविवार दिनांक २० मार्च २०२२ ला सायंकाळी ७: ०० वाजता दर रविवारी धम्म आपल्या दारी या धम्म जागृती अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.*

*तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांचे अनुयायी, कार्यकर्ते धम्म आणि बाबासाहेबांचे विचार संघटन सांगण्यात कमी पडत असल्याने विरोधक आपल्या समाजात नानाविध विकृतीचे अतिक्रमण करीत आहेत. म्हणून समाज बांधवांनो धम्माचे पालेमूळे रूजविण्यासाठी पुढे या, योगदान द्या आणि बाबासाहेबांच्या उपकारांचे थोडेतरी उतराई व्हा.*

*सदर कार्यक्रमास ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथील आदरणीय भंते कश्यप आणि बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे आपले मनोगत व्यक्त करतील.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here