जाडर बोबलाद येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात वंचित बहुजन आघाडी कडून १३ ठराव…

लोकदर्शन 👉 राहुल खरात

जत (सांगली जिल्हा)

वंचित बहुजन आघाडी जत ता लुका च्या वतीने १३ मार्च २०२२ रोजी जत तालुक्यातील जाडर बोबलाद या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सांगली जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी यांनी १३ ठराव मांडले व उपस्थित जनतेने हात उंचावून ठरावास मंजुरी दिली.सदर ठराव पुढीलप्रमाणे –

१) करोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा.

२) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून विजबिलाच्या माध्यमातून शेतकऱ्याची होत असलेली पिळवणूक थांबवावी पण शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोफत विद्युत पुरवठा करण्यात यावे.

३) म्हैशाळ ६ व्या टप्प्याचे पाणी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला १२ महिने मिळालेच पाहिजेच.

४) जत तालुक्यातील शेतकरी सुशिक्षित तरुण मुलांना शेतीच्या विविध विकासासाठी त्वरित अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे.

५) जत तालुक्यातील सर्व गावांना पिण्याचे स्वच्छ पाणी टँकरच्या माध्यमातून ताबडतोब उपलब्ध करून द्यावे.

६) शेतकऱ्यांच्या मालविक्रीसाठी स्वतः विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे.

७) शेती सोबतच इतर शेती निगडीत व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात यावे.

८) शेतकऱ्यांना खते व बी बियाणे त्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी.

९) शेतकऱ्यांची होत असलेली आत्महत्या रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

१०) मयत शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व लग्नासाठी शासकिय अर्थसहाय्य करावे, व प्रथम मुलास शासकीय नोकरी देण्यात यावी व त्यांच्या पत्नीस दरमहा ५००० रुपये पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

११) शेतकऱ्यांचे होणारे नैसर्गिक आपत्तीतून होणारे नुकसान भरपाई एकरी हमीभाव पेक्षा दुपटीने द्यावी तसेच याचे पूर्व परीक्षण करून लगेच निर्णय घेण्यासाठी किसान आपत्ती समिती स्थापन करून अनुदान त्वरित मिळावे.

१२) शेतमजुरांना व अल्प भु धारक यांना शासनाच्या पडीक जमिनी ९९ वर्षाच्या करारावर कसण्यासाठी देण्यात यावेत.

१३) शेतीतून मिळणाऱ्या पिकाला शेतऱ्याने विक्री केल्यानंतर १५ दिवसाच्या आत त्याची बिले अदा करण्यात यावीत. बिले अदा करण्यास विलंब केल्यास त्या खरेदी दारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल (अण्णा) पुजारी हे होते.सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सर होते.यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हासंघटक संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश क्षीरसागर हरीश वाघमारे जिल्हा संघटक प्राध्यापक वाघमोडे सर जिल्हा सदस्य संजय उर्फ बंडू कांबळे,जिल्हा सदस्य अनिल अंकलखोपे, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष राजू मुलानी, जाडर बबलाद चे उपसरपंच काटे साहेब, बजरंग अण्णा होंकळे, सुभाष साबळे अमोल साबळे, साहेबराव उबाळे व जत तालुक्याचे वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी आणि जाडर बबलाद जिल्हा परिषद गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकरी मेळावाचे अचूक आयोजन केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी जत तालुक्याचे मा.विठ्ठल (आण्णा) पुजारी यांच्या वर शेतकरी व शेत मजूर यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्व थरातू मा.विठ्ठल (आण्णा) पुजारी यांचे कौतुक होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *