नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन.

0
117

By : Mohan Bharti

राजुरा :– राजुरा शहरातील ज्योतिबा फुले शाळेपासून तर सोमनाथपूर चौक पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले. शहर विकासासाठी उपलब्ध विशेष निधीतून रस्ता डांबरीकरण हे काम सुरू असून स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार येथे हे काम सुरू आहे.
या प्रसंगी राजुरा न प चे नगरसेवक तथा सभापती हरजितसिंग संधू, वज्रमाला बतकमवार, विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेविका साधना भाके, अभियंता रवी जामुनकर, नागेश कोटरंगे, ज्ञानेश्वर जाभोर यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here