Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे? केंद्र सरकारने दिले असे संकेत

0
98

–लोकदर्शन 👉 मोहन भारती
नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे. देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांचे निदान होत असून, तीन हजारांहून अधिक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडूनही लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत.

लॉकडाऊनसारख्या उपायांवर चर्चा सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोलोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जाणार का, असा प्रश्न विचारला असता नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जर गरज भासली तर त्या पर्यायांवरही चर्चा होते. २९ एप्रिल रोजी राज्यांना सविस्तरपणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाची चेन तोडण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीसह सर्वप्रकारच्या निर्बंधांबाबत सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here