शुगल फेब्रिकेशनचे संचालक श्री गजानन खर्चे यांचे अनुकरण करावे – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*22 ऑक्सिजन सिलेंडर तहसिलदार वरोरा यांना सुपूर्द*

– वरोरा शहरातील सामाजिक दृष्टी असनारे श्री गजानन खर्चे संचालक शुगल फेब्रिकेशन यांनी आपल्या कडे लाॅकडाऊन काळात कामात नसलेले 22 जम्बो सिलेंडर तहसिलदार वरोरा व डाॅ. येडे यांना सुपूर्द करतांना त्यांचे श्री हंसराज अहीर यांनी स्वागत सन्मान केला. श्री खर्चे यांचे हे सामाजिक बांधिलकीतून अनुकरणीय कार्य आहे. याच सिलेंडरचा आपल्या उद्योगात वापर करणाऱ्या उद्योग व व्यवसायीकांनी अनुकरण करावे असे हे कार्य आहे असे उद्गार याप्रसंगी काढले.
कोरोना संकट काळात अनेाकांना आॅक्सीजनची गरज या माध्यमातून पूर्ण होवू शकते, बेड संख्येत वाढ होईल, अनेकांचे जीव वाचु शकतात. या संकट काळात आपल्या हातून सेवा घडवून आणण्याची आपल्या सर्वांना संधी आहे. ज्या उद्योगामध्ये अथवा व्यवसायीकांकडे आॅक्सीजन सिलेंडरचा वापर होत आहे अशा उद्योगांनी व व्यवसायीकांनी रूग्णांच्या सेवेकरिता आपल्याकडील सिलेंडर आपल्या तालुक्यातील तहसिलदार, उप विभागीय अधिकारी यांचेकडे काही काळाकरिता सुपूर्द करून सेवेसाठी समोर यावे असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *