अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण करून नव्याने श्रेय लाटण्याचा लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न अ‍ॅड. संजय धोटे

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर 

राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू आणि निवडणूकांनंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जून २०१८ मध्ये १४.१७ कोटी रुपयांची इमारत कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली. जुलै – २०१५ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. वारंवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन तत्कालीन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करू त्यांनी आपल्या कार्यकाळात सन २०१९ पर्यंत काम पूर्ण करून घेतले. परंतु रुग्णालयात आवश्यक अद्ययावत उपकरणे खरेदी आणि वाढीव पडनिर्मिती साठी आरोग्य संचालनायलात विलंब झाल्याने त्यावेळी इमारतीचे लोकार्पण होऊ शकले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय इमारत तेव्हाच आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती.
परंतु तयार विकासकामांचे श्रेय लायटण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी कडून होत आहे. आपली विकासकामाबद्दल असलेली अकार्यक्षमता व अर्थसंकल्पातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी असलेल्या अल्प तरतुदी लपविण्यासाठी आज रुग्णालय इमारत लोकार्पण कार्यक्रम घेतला आहे. प्रशासनाकडून कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यक्रमावर निर्बंध लावले जात असताना शासनाच्या नियमाला बाजूला सारून आज हा कार्यक्रम घेतला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केला आहे.
उपजिल्हा रुग्णालय राजुरा करिता एकत्रिकरण पणे यानुसार निधी व पदे भरण्यात आली.

१२ कोटी ६४ लाख रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी आतापर्यंत उपरोक्त रुग्णालयास खर्च करण्यात आला.मुळ रक्कम १४कोटी१७ लक्ष प्रशासकीय मान्यता प्राप्त मिळाली आहे. प्रशासकिय मान्यता दिनांक. २ सप्टेंबर २०१४ निधी ७ कोटी ५८.०० लक्ष, सुधारीत मान्यता १४ कोटी १७ लक्ष, आकृती बंधानुसार १०० खाटयांच्या रूग्णालयाकरीता ९ पदांना मंजुरी. वैद्यकिय अधिक्षक वर्ग १ एक पद. वैद्यकिय अधिकारी वर्ग २ गट अ ३ पदे, स्त्री रोग व प्रसुति तज्ञ – १, वैद्यकिय अधिकारी बधिरीकरण शास्त्रज्ञ २ वैद्यकिय अधिकारी भिषक तज्ञ – १, वैद्यकिय अधिकारी बालरोग तज्ञ – १, वैद्यकिय अधिकारी अस्थिव्यंग तज्ञ – १ ,वैद्यकिय अधिकारी नेत्रशल्य चिकित्सक – १,वैद्यकिय अधिकारी अपधात कक्ष ११ वैद्यकिय अधिकारी दंत शल्य चिकित्सक – १, वैद्यकिय अधिकारी गट ब १ अशी एकुण १५ पदे मंजुर असुन त्यापैकी ११ डॉक्टर आपल्या राजुरा येथील रूग्णालयात कार्यरत असुन रिक्त पदे तातडीने भरण्यात येईल.. तसेच इतर ८० पदांपैकी काही पदे भरलेली आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *