प्रा. आ. केंद्र घुग्गुसला एसीसी चांदा सिमेंट वर्क्स तर्फे रुग्णवाहिका

0
68

By shivaji selokar
*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित*

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एसीसी चांदा सिमेंट वर्क्स यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुस ला रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.एसीसी चांदा सिमेंट वर्क्स व्यवस्थापनाने दि. 17 मे रोजी आ. मुनगंटीवार यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.

दि . 4 मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सर्व उद्योगांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन त्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. उद्योगांनी त्यांच्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले होते .त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसीसी चांदा सिमेंट वर्क्स यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुस ला रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. त्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराबद्दल आणि एसीसी कम्पनीच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here