पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला राजुरा विधानसभेतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा.

0
323

  • लोकदर्शन 👉 मोहन भारती
    *⭕उपजिल्हा रुग्णालय, कोव्हिड केअर सेंटरला दिली भेट.*

राजुरा – पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, कोविड केअर सेंटर समाजकल्याण वसतिगृह राजुरा येथे आज भेट दिली. येथील कोरोना रुग्णांना विचारपूस करून व्यवस्था जाणून घेतली. यानंतर लगेच उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात विधानसभा क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
सर्वसामान्य जनता सध्या कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावांने त्रस्त आहे. राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन बेड, रेमिडीसीवर इंजेक्‍शन तसेच अन्य आवश्यक समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे सतत प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरात लवकर येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसिलदार हरिष गाडे, तहसिलदार महिंद्र वाकलेकर, तहसिलदार के. डी. मेश्राम, मुख्याधिकारी आर्शीया जुही, डॉ विशाखा शेळकी, सूर्यकांत पिदुरकर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, बापुराव पाचपटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश नगराळे, डॉ. डी. पी. चकोले,डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. संदीप बांबोळे, डॉ. गेडाम, डॉ. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, डॉ. अशोक जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, उपविभागीय अभियंता बाजारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगर सेवक हरजीत सिंग, नायब तहसीलदार विनोद डोंनगावकर, अमित बनसोडे, अतुल गांगुर्डे आदी आढावा बैठकीत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here