Home
Home Breaking News ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकारिणी घोषित; सुनिल झळके यांच्याकडे अध्यक्षपदाची...

ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकारिणी घोषित; सुनिल झळके यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

लोकदर्शन कल्याण (👉 गुरुनाथ तिरपणकर)

गेल्या ३५ वर्षांची परंपरा लाभलेल्या ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी सुनिल झळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कै. मधुसूदन ठोसर, कै. दि.भा. मुंडले, कै. अरुणकुमार भगत आदी संस्थापक सदस्यांच्या अथक प्रयत्नातून या संघाची स्थापना झाली असून आजही जुन्या व अनुभवी सदस्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे मानले जाते. नव्या कार्यकारिणीच्या निवडीवेळी संस्थापक सदस्यांनी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी कल्याण येथील प्र. के. अत्रे नाट्यगृहामागील सुभाष मैदान येथे आयोजित सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. जेष्ठ सदस्य आर.एन. पिंजारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

या वेळी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली —
सचिव: सूर्यकांत भडांगे
खजिनदार: अशोक हासे
सहखजिनदार: अनंत बोरसे
कार्याध्यक्ष: विजय चव्हाण
उपाध्यक्ष: गुरुनाथ तिरपणकर
सहसचिव: मनोहर गायकवाड

कार्यकारिणी सदस्य: प्रदीप जोशी, नाना म्हात्रे
सल्लागार: अरविंद म्हात्रे, जैतु मुठोळकर, महादेव गोळवसकर, सुनिल इंगळे, विवेक मालशे, आर.एन. पिंजारी

प्रसिद्धी प्रमुख म्हणून गुरुनाथ तिरपणकर व सुभाष जैन यांची निवड करण्यात आली.

सभेदरम्यान अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था मनोहर गायकवाड यांनी केली होती. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

सभेच्या शेवटी माजी अध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्या पत्नी प्रमिला अरविंद म्हात्रे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सभेची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here