लोकदर्शन वालूर 👉महादेव गिरी
वालूर (प्रतिनिधी) : वालूर येथील सिद्राम बादशाह मठ संस्थान परिसरात वारंवार तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पालकमंत्री नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर तसेच वालूरचे सरपंच संजय साडेगावकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर व सरपंच संजय साडेगावकर यांनी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून वीज समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार संबंधित विभागाच्या पथकाने वालूर येथे येऊन 100 के.व्ही. डीपी उभारून नवीन वीजरोहित्र कार्यान्वित केले.
लाईनमन सर्जेराव सहजराव, सतीश बुधवंत, मिलिंद सहजराव व शेख रफिक यांनी वीजपुरवठा सुरळीत सुरू केला. यामुळे सिद्राम बादशाह मठ संस्थान परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी राजेश साडेगावकर, ग्रामपंचायत सदस्य बबनराव बोडखे, शिवाजी सारूक, भीमराव सारूक, भगवान राऊत, बाबाराव आप्पा गवळी आदी उपस्थित होते.





