Home
Home राजुरा संघटन सृजन अभियानातून काँग्रेसला नवे बळ; चंद्रपूरातील आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

संघटन सृजन अभियानातून काँग्रेसला नवे बळ; चंद्रपूरातील आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर :दिनांक 4एप्रिल 2026
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने एन. डी. हॉटेल येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पक्ष संघटना अधिक मजबूत, सक्षम व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या बैठकीस काँग्रेसचे निरीक्षक संतोषजी कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक अभयजी छाजेड, खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हाध्यक्ष संतोषजी लहामगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांशी समन्वय वाढविणे, बूथस्तरावरील संघटन सशक्त करणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना संतोषजी कोलकोंडा यांनी सांगितले की, संघटन मजबूत असेल तरच पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय राहून पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवावी. अभयजी छाजेड यांनीही काँग्रेस पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज असल्याचे सांगत संघटन सृजन अभियानातून पक्षाला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत एकजूट व सक्रिय सहभागातून संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे आणि शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून पक्ष अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष याशिम शेख, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, एनएसयूआय अध्यक्ष शफाक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here