लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा : आज शनी देव जयंतीचे औचित्य साधून राजुरा येथील नगर परिषद जवळील हनुमान मंदिर परिसरात असलेल्या शनिदेवाची सपत्नीक पूजा-अर्चना व तैलाभिषेक करण्यात आला. यावेळी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी मंगल कामना करण्यात आली.
यावेळी बोलताना शनी देव प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देतात तसेच मानवाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात, असे मत व्यक्त करण्यात आले. माणसाने आपले कर्म नेहमी प्रामाणिक, नीतिमान व परोपकारी ठेवावे, हाच संदेश शनी देवांच्या चरित्रातून मिळतो. हा आदर्श अंगीकारून प्रत्येकाने आनंदमय जीवन जगावे, असेही सांगण्यात आले.
या प्रसंगी पत्नी सौ. अर्चना यांच्यासह भाजपाचे राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, भाजपा नेते राधेश्याम अडाणीया, दिलीप वांढरे, गजेंद्र झंवर, शहर महामंत्री सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे, गणेश रेकलवार, पं. भानुप्रताप उपाध्याय महाराज, उमेश गोरे, प्रीती रेकलवार, पूनम शर्मा, मयूर बोनगीरवार, महेश झाडे, किरण शिवणकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





