Home
Home गडचांदूर / कोरपणा *राजुरा विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत उपकरण वितरण...

*राजुरा विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत उपकरण वितरण शिबिर* *♦️“दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा” — आमदार देवराव भोंगळे*

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा : राजुरा विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी एसआर ट्रस्ट व एलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव तसेच विविध सहाय्यभूत उपकरणांचे निःशुल्क मोजमाप व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राजुरा, कोरपना, गोंडपिपरी आणि जिवती या चारही तालुक्यांमध्ये नियोजित तारखांना पार पडणार आहे.

“प्रत्येक गरजू दिव्यांगापर्यंत शिबिराची माहिती पोहोचविणे आवश्यक” — देवराव भोंगळे

या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या कृत्रिम अवयवांसह विविध सहाय्यभूत साधनांचा लाभ मिळणार असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले आहे.

“भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार-प्रसारात पुढाकार घ्यावा” — आमदार देवराव भोंगळे

तसेच स्थानिक पातळीवरील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधितांनी शिबिराची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवावी. नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबत दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून या शिबिराचा व्यापक प्रचार-प्रसार करावा, जेणेकरून अधिकाधिक लाभार्थींना या उपक्रमाचा लाभ मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here