लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर : लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन, महावीर इंटरनॅशनल तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार असून, निवड झालेल्या रुग्णांवर कृत्रिम भिंगारोपणासह मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर शस्त्रक्रिया सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवाग्राम येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
विशेषतः ५० वर्षांवरील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिराचे आयोजन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, गडचांदूर यांच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष श्री. अनिल बिताडे व सचिव श्री. सतीश उपलेचवार यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.





