Home
Home बल्लारपूर “वाढदिवसाचे औचित्य साधत पर्यावरणाचा संदेश : बल्लारपूरमध्ये युवक काँग्रेसकडून वृक्ष भेट उपक्रम”

“वाढदिवसाचे औचित्य साधत पर्यावरणाचा संदेश : बल्लारपूरमध्ये युवक काँग्रेसकडून वृक्ष भेट उपक्रम”

लोकदर्शन 👉मोहन भारती

बल्लारपूर (ता.प्र.) : चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू अजय धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर शहर युवक काँग्रेसतर्फे अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच विविध शासकीय कार्यालयांना भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष भेट देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. युवक काँग्रेसच्या या सामाजिक उपक्रमाला मान्यवरांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश बावणे, बल्लारपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश आनंद, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते रोहित चुटे, लक्ष्मण यादव, रोहित आमटे तसेच बल्लारपूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणपूरक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here