–लोकदर्शन इंदापूर👉प्रतिनिधी
कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे आणि उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शोषित-पीडितांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवणारे, शिक्षण सर्वांसाठी खुलं करणारे आणि स्त्री-शिक्षणाची क्रांती घडवणारे महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते; तर ते समतेच्या लढ्याचे खरे दीपस्तंभ होते. त्यांचे विचार, त्यांची निडरता आणि मानवतावादी दृष्टिकोन आजही समाजाला दिशा दाखवतात.”
कार्यक्रमास डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. विजय केसकर, डॉ. विलास बुवा, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक बांधिलकीची प्रेरणा जागवणारा हा कार्यक्रम समाधानकारक वातावरणात पार पडला.





