Home
Home मुंबई * *“उत्सवांची उधळण : चंद्रभान शर्मा कॉलेजचा चार दिवसीय मेगा कल्चरल फेस्ट...

* *“उत्सवांची उधळण : चंद्रभान शर्मा कॉलेजचा चार दिवसीय मेगा कल्चरल फेस्ट दिमाखात संपन्न”*

लोकदर्शन👉राहुल खरात

चंद्रभान शर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) यांनी 2025–26 या शैक्षणिक वर्षातील चार दिवसीय मेगा कल्चरल फेस्ट मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवित या सांस्कृतिक पर्वाची रंगत अधिकच वाढवली.

फेस्टदरम्यान द बिझ बझ (कॉमर्स), सिनर्जी (BCA), इम्पल्स (ज्युनियर कॉलेज) आणि टेक हेस्ट (IT) यांसारख्या विभागीय उत्सवांचे आयोजन करण्यात आले. अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग, मॅनेजमेंट, कोडिंग, अॅप डेव्हलपमेंट, टेक डिबेट आणि करंट अफेअर्स अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले.

कॉलेजमध्ये झालेल्या टॅलेंट हंट – अंतर्गत महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा 2025 मध्ये संगीत, नृत्य, नाट्य आणि कला या विभागांमध्ये विद्यार्थ्यांच्या चमकदार आणि प्रभावी सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. या स्पर्धांचे उद्घाटन लोकप्रिय पार्श्वगायक आदर्श शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्यवस्थापक विश्वस्त श्री. प्रशांत जी. शर्मा आणि प्राचार्या डॉ. वैशाली राजपूत उपस्थित होते.

उत्सवाचा समारोप राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ख्वाहिश 2025–26 च्या भव्य बॅनर ड्रॉप सोहळ्याने करण्यात आला. “ऐसा देश है मेरा” हा यावर्षीचा थीम या प्रसंगी अनावरण करण्यात आला. समारंभाला श्री. कमलेश ठाकूर, श्री. शिव ठाकरे, श्री. मणि ममल्लन तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. सोबतच झालेल्या कॉन्टिंजंट लीडर्स मीट मध्ये मुंबईतील अनेक महाविद्यालयांनी विक्रमी नोंदणी केली.

राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ख्वाहिश 2025–26 दिनांक 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार असून, यंदाचा महोत्सव तरुणाईच्या कलागुणांचे अधिक वैविध्यपूर्ण आणि विलोभनीय दर्शन घडवणार आहे.

— शुभम पेडामकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here