लोकदर्शन 👉 रवि गेलडा
गडचांदूर – सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 4 मध्ये निर्दलीय उमेदवार मा. निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्वात नागरिक संवाद व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या सभेला गडचांदूर नगर विकास आघाडीचे माजी आमदार श्री. वामनराव चटप, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. विलास काकाजी धांडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. निलेश ताजणे, तसेच प्रभागाचे उमेदवार श्री. महेशभाऊ आवारी आणि सौ. संगीताताई तेरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सभेचे स्वरूप केवळ राजकीय मर्यादेत न राहता प्रभागातील वास्तव समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेणारे आणि उपायमार्ग दाखवणारे असे होते. नागरिकांनी गेल्या काही वर्षांत विकासाअभावी निर्माण झालेल्या पायाभूत अडचणी थेट मांडल्या.
निलेशभाऊ ताजणे यांनी या सर्व मागण्या स्वीकारत प्रभागासाठी ठोस व सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर केला. “प्रत्येक नागरिकाला सुविधा मिळाल्याशिवाय समाधान नाही; प्रभागाचा सर्वांगीण बदल हा आमचा निर्धार आहे,” असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर संतापलेल्या नागरिकांनीही यावेळी आवाज बुलंद करीत म्हटले की—
“आता फक्त आश्वासनं नकोत! गडचांदूरला काम करणारा नेता हवा, आणि तो म्हणजे निलेशभाऊ ताजणे!”
सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्र. 4 मध्ये परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.





