Home
Home गडचांदूर / कोरपणा निमणीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ♦️निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात...

निमणीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ♦️निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांचा आक्रोश; चौकशीची मागणी

लोकदर्शन निमणी/बाखर्डी👉उमेश राजुरकर

कोरपना तालुक्यातील निमणी गावातील प्रमोद बुऱ्हाण ते धुणकी रोड मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामात मूलभूत तांत्रिक प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी हा रस्ता लवकरच नादुरुस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की—

खोदाई व सोलिंग न करता थेट मातीवर PCC करण्यात आले

80mm गिट्टीचा वापर न करता सरळ पृष्ठभागावर काम सुरू

PCC व RCC दोन्ही करताना कॉम्पेक्शन न करण्याचा आरोप

साइटवर फक्त नीडल व्हायब्रेटर दाखवण्यासाठी आणल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे

मातीमिश्रीत रेती व कमी दर्जाची गिट्टी वापर

M-20 दर्जाचे काँक्रीट नसल्याचा आरोप

या प्रकल्पासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ९.९० लाख रुपये मंजूर आहेत. मात्र वापरलेल्या साहित्याचा दर्जा व कामाची गुणवत्ता पाहता, सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यासंदर्भात माजी उपसरपंच उमेश राजुरकर म्हणाले —

> “काम निकृष्ट दर्जाचे असून, नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. तात्काळ तपासणी करून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.”

ग्रामस्थांनी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली असून, दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील व्यक्त केला आहे.

स्थानिक स्तरावर या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत चर्चा रंगली असून,
तपास व चौकशीसाठी संबंधित विभागावर दबाव वाढताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here