Home
Home गडचांदूर / कोरपणा गडचांदूरमध्ये आमदार भोंगळे सक्रिय; प्रत्यक्ष पाहणीसह विकासकामांना गती

गडचांदूरमध्ये आमदार भोंगळे सक्रिय; प्रत्यक्ष पाहणीसह विकासकामांना गती

लोकदर्शन प्रतिनिधी👉 : रवि गेलडा

गडचांदूर : नगरपरिषद निवडणुकांची घोषणा झाल्यापासून गडचांदूर शहरात राजकीय हालचाली अधिक वेगाने सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार देवराव (दादा) भोंगळे यांनी नागरी भागातील विकास व समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सर्व वॉर्डांमध्ये संवाद मोहिमेची गती वाढविली आहे.

शहरातील विविध वस्ती आणि लेआऊटमध्ये भेटी देताना कोणत्या ठिकाणी कोणत्या कामांची आवश्यकता आहे, याची माहिती आमदार स्वतः नागरिकांकडून जाणून घेत आहेत. संबंधित विभागांना तातडीने कामांचे आदेश देऊन काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी देखील केली जात आहे. हाफिज लेआऊटमधील पाणीपुरवठा आणि रस्ते दुरुस्तीची कामे सध्या प्राधान्याने सुरू असल्याचे समजते.

नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेण्याची आमदारांची सक्रिय भूमिका स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.
शहरातील काही वॉर्डांमध्ये तुल्यबळ निवडणूक लढतीची शक्यता व्यक्त होत असल्याने नेत्यांकडून अधिक मेहनत घेतली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

निवडणूक वातावरण तापत असताना विविध आघाड्यांचे कार्यकर्ते जनसंपर्क उपक्रम राबवत आहेत. येत्या दिवसांत प्रचाराची गती आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here