By : Shankar Tadas
कोरपना :
प्रेमात अडसर ठरतोय म्हणून पत्नीच्या प्रियकराने वनसडी येथील सलून चालकाचा खून केल्याची घटना घडली. कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीतील नारांडा येथील ही घटना 16/11/2025 रोजी सायंकाळी सात ते आठ वाजताची घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयत नितेश रामदास वाटेकर रा.नारांडा वय 38 वर्ष वनसडी येथे सलूनचे दुकान चालवत होता.2022 पासून नितेश व त्याची पत्नी साधना व मुलगी महेक वंय 9 हे गडचांदूर येथे अरविंद ताकसांडे यांच्या घरी किरायाने राहत होते . दररोज सकाळी 8 वाजता गडचांदूर येथून वनसडी येथे आपल्या सलून व्यवसाय करून सायंकाळी 8 वाजता परत जात होता . पत्नी साधना घरी एकटीच राहत होती . बादल सोनी हा याच्या घरी येत होता. दरम्यान, त्या दोघांची चांगली ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात होऊन अनैतिक सबंध आले .या प्रेमप्रकरणामुळे नितेश व साधना पती पत्नीत नेहमी वाद होत होते. बादल विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली. तेव्हा यापुढे मी असे कृत्य करणार नाही असे सांगितले . काही महिने नितेश व साधना हे चंद्रपूर येथे राहण्यास गेले. चंद्रपूर वरून आपल्या गावी नारंडा येथे एक महिन्या पासून कुटुंबासह राहून वनसडी येतील सलून चे दुकान नेहमी चालवत होता . मात्र बादल व साधना याचे प्रेमप्रकरण पडद्याआड चालू होते . बादलने साधनाला मोबाईल सुद्धा घेऊन दिला. फोन वरून साधनाकडून नितेश बद्दल दुकानात केव्हा जाते परत किती वाजता येते माहिती घेतली. तसेच माझ्या सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या न माझ्या प्रेमात आडवा आल्यास नितेश् जिवे मारण्याची धमकी देत होता.नेहमी प्रमाणे नितेश 16/11/2025 ला संध्याकाळी 7 वाजता सलून चे दुकान बंद करून वनसडी वरुन् नारंडा येथे घरी येत असताना नारंडा पोच मार्गावर पुलाजवळ दुचाकीचा अपघात होऊन रोडवर गंभीर अस्थेत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. त्याच्या नातेवाईकांनी नितेशला ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे उपचारासाठी आणले. नितेशच्या डोक्याला गंभीर जखमा होऊन असल्याने त्याला डॉकटरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासाणीसाठी शव पोलिसांनी ताब्यात घेतले
: कोरपणा पोलिस पथकाने 17 ला सकाळी घटना स्थळाची पाहणी झाल्यावर घटनेत पोलिसाना संशय आला. हा अपघात नसून घातपात असल्याचे लक्षात आले. कोरपणा पोलीस पथकाने उलटे चक्र फिरवून अवघ्या चार तासात दोन आरोपीना गडचांदूर येथून ताब्यात घेतले. आरोपी बादल सोनी वय 22, दुसरा तुशार येणगंटीवर वय 19 दोन्ही राहणार गडचांदूर यांना अटक केली व त्या विरोधात कोरपणा पोलीस स्टेशनला अप क्र. 0270/2025 भा.न्या स कलम 203 ( 1) ,2(5) बी एन. एस.अनवे गुन्हा दाखल करण्यात आला. शव विच्छेदन करून शव नातेवाईकांना अंत्यविधी देण्यात आले. मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक व रवींद्र जाधव उव विभागीय पोलीस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास कोरपना ठाणेदार लता वाडिवे,देवानंद केकण पोलीस उपनिरीक्षक , प्रकाश राठोड पोलीस उपनिरीक्षक ,प्रभाकर जाधव पो.ह साईनाथ जायभाये पो ह.बळीराम पवार पोह राकेश वाकुलकर पोह ,रामदास आडे ना.पो.पंढरी सिडाम पोह. तपास करीत आहे.





