लोकदर्शन गडचांदूर👉रवि गेलडा
आगामी नगरपरिषद निवडणुका 2025 जवळ येत असताना गडचांदूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत असून, शिंदे सेनेचा झेंडा दिवसेंदिवस फडकत असल्याचे चित्र दिसत आहे.
राजुरा विधानसभेतील ‘ढाण्या वाघ’ म्हणून ओळखले जाणारे धनु भाऊ छाजेड यांनी जवळपास दहा वर्षांच्या राजकीय विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात पुनरागमन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर व कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत तसेच चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडूभाऊ हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवबंधन बांधले.
या प्रवेशावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व सचिन भाऊ गुरनुले, शिवसेना उभाटाचे सुधाकर भाऊ ताजणे, तसेच शांताराम भाऊ कुरसंगे, अनिल भाऊ सिडाम यांसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली.
धनु भाऊ छाजेड यांनी सांगितले की, “गडचांदूर आणि परिसरात आगामी काही दिवसांत आणखी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. शिवसेना शिंदे गटात अनेक नामांकित कार्यकर्ते दाखल होणार असून, पक्ष अधिक बळकट होईल.”
या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख राकेश भाऊ राठोड, शहर प्रमुख विकी राठोड, युवासेना तालुकाप्रमुख अरविंद गोरे, तसेच अन्य शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





