Home
Home Breaking News राहूफभाई सोबत सुधीरभाऊंची भेट घेऊन बंडूभाऊ चौधरी यांचा नोकरीचा अर्ज सादर ...

राहूफभाई सोबत सुधीरभाऊंची भेट घेऊन बंडूभाऊ चौधरी यांचा नोकरीचा अर्ज सादर ♦️मुनगंटीवार यांनी त्वरित कारवाईसाठी दिले पत्

लोकदर्शन 👉 — मोहन भारती

गडचांदूर — स्थानिक युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने बंडूभाऊ चौधरी यांनी आज गडचांदूरचे माजी सरपंच राहूफभाई यांच्या सोबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या जावई धीरज जुनारकर (इसापूर) यांच्या नोकरीसाठी वैयक्तिकरित्या अर्ज सादर केला.

या प्रसंगी सुधीरभाऊंनी संबंधित अर्जाचा त्वरित विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यावेळी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शासकीय योजनांचा योग्य लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे यावरही सविस्तर चर्चा झाली.

स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीने ही भेट सकारात्मक ठरेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here