Home
Home गडचांदूर / कोरपणा रऊफ खान यांनी अस्वच्छ व्यक्तीला दिला नवजीवनाचा स्पर्श ♦️माणुसकीचं जिवंत उदाहरण

रऊफ खान यांनी अस्वच्छ व्यक्तीला दिला नवजीवनाचा स्पर्श ♦️माणुसकीचं जिवंत उदाहरण

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर :
आजच्या स्वार्थी जगात जिथे अनेक जण सामाजिक कार्यापासून दुरावले आहेत, तिथे कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान पठाण यांनी माणुसकीचं असामान्य उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

रविवारी सकाळी कोरपना परिसरात एक अज्ञात व्यक्ती अतिशय अस्वच्छ अवस्थेत, दाढी वाढलेली, फाटके कपडे घालून रस्त्याच्या कडेला असहाय्यपणे बसलेली दिसली. हे दृश्य पाहताच रऊफ खान यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीकडे सहृदयतेने लक्ष दिले.

त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीची दाढी कटिंग करून घेतली, त्याला स्वच्छ कपडे व ब्लँकेट दिले, तसेच गरम जेवणाचीही सोय करून दिली.
हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले तर काहींनी या माणुसकीच्या कार्याला टाळ्यांनी दाद दिली.

रऊफ खान यांचा हा सेवाभाव “माणूस माणसाला ओळखत नाही” अशा काळात समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे. अनेकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक करत सोशल मीडियावरही प्रशंसा केली आहे.

लोकदर्शनचे विशेष निरीक्षण:
समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी हात पुढे करणं ही खरी समाजसेवा आहे. रऊफ खान यांनी हे सिद्ध केलं की पद नसतानाही समाजासाठी खारीचा वाटा उचलता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here