कामगार नेते साईनाथ बुच्चे यांचे निधन

कोरपना :

अल्टाटेक सिमेंट कंपनी आवाळपूर मध्ये स्थित एल. अँड टी. कामगार युनियनचे महासचिव कामगार नेते साईनाथ बुच्चे (६२) यांचे आज सोमवार सकाळी १०.१५ वाजता नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
19 मार्चला सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना एका दुचाकीने त्यांना धडक दिली होती. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली होती. दरम्यान त्यांना चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचाराकरिता दाखल केले.
उपचाराला प्रतिसाद देत असतानाच दोन दिवसा अगोदर अचानक त्यांची प्रकृती खालावली. आज दिनांक २१ ला सकाळी त्यांचे निधन झाले. साईनाथ बुच्चे गेल्या तीन दशकांपासून कामगारांच्या समस्यांसाठी झटत होते. कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी अनेक आंदोलने केली. कामगार नेते म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. कामगार नेते माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे ते कट्टर समर्थक होते. बिबी येथे मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंड व बराच मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता बिबी येथे अंत्यसंस्कार पार पडतील असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here