कोरपना : मागील वर्षभरापासून अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या मोठ्या मुलाकडे वास्तव्यास असलेले बोरी नवेगाव येथील श्री नामदेवराव लोभाजी वाघमारे (वय 76) यांचे आज 1 एप्रिल 2025 रोजी रेल्वे प्रवासादरम्यान अचानक निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा बालाजी नामदेव वाघमारे विवेकानंद केंद्र विद्यालयात मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असून उन्हाळी सुटीमध्ये ते वडील आणि परिवारासह आपल्या मूळ गावी बोरी नवेगाव ता. कोरपना येथे येत होते. त्यावेळी हावडा -नागपूर मार्गात असताना अचानक नामदेवराव वाघमारे यांना रक्ताची उलटी झाली. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता काही वेळातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता गावात कळताच शोककळा पसरली आहे. महाराज म्हणून ते ओळखले जात. त्यांचा तीर्थ पर्यटनाचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचा परिचय सर्वदूर होता. त्यांच्यामागे दोन मुले बालाजी वाघमारे व शामसुंदर वाघमारे ही मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार असून आज बुधवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव गावी आणले जाईल. गुरुवारी सकाळी बोरी नवेगाव येथे अंत्यविधी पार पडेल.