सोनुर्ली येथील शेतकरी संघटना व काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

By : Shankar Tadas

कोरपना :
भाजपा पक्षाचा कार्यप्रणालीवर, महायुती सरकारच्या ध्येयधोरणांवर तसेच महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील मारुती बोबडे, बाळा मालेकर, मनोहर ढेंगळे, बुद्धिस्ट चुनारकर, महेंद्र जुनारकर, अंकुश पिंपळकर, अविनाश सहारे यांनी भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.

यावेळी तालुका उपाध्यक्ष सुधाकर ताजने, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, तालुका उपाध्यक्ष प्रमोद पायघन आदिवासी नेते तिरुपती किनाके, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष धम्मकीर्ती कापसे, सागर धुर्वे गुलाबराव आस्वले, संजय जुमनाके, यादव खिरटकर, हरेश्वर भोंगळे अमोल पठाडे, गजानन भोंगळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here