शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी नवी मुंबई तर्फे मकर संक्रांती उत्सव 2023 चे आयोजन

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि. 5 जानेवारी इष्टलिंग अविष्कार दिवस आणि मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी नवी मुंबई तर्फे रविवार दि 15 जानेवारी 2023 रोजी शिव विष्णू मंदिर सभागृह, पहिला मजला, प्लॉट नं. 8/9, वाशी बस डेपोच्या पाठिमागे, सेक्टर 9/A वाशी, नवी मुंबई येथे सायंकाळी 5 वाजता इष्टलिंग दिवस आणि मकर संक्राती उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

हळदी कूंकू समारंभ व भेटवस्तू वाटप, लहान मुलांना फळांचा अभिषेक व भेट वस्तु वाटप, मराठी,कन्नड व हिंदी सदाबहार मधूर गीतांचा भव्य संगीतमय कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पाच वर्षे वयाच्या आतील मुलामुलींच्या पालकांनी संस्थेच्या सदस्यांकडे आपली नांवे नोंदवावीत.त्याचबरोबर कार्यक्रमानंतर सर्वांसाठी पारंपारिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा असे आवाहन शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेत असून या कार्यक्रमात, उत्सवात सहभागी होण्यासाठी तथा अधिक माहितीसाठी सुनिता लक्कीमार – 9920593414,
स्नेहा हळ्ळी – 9702066660 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here