Home
Home गडचांदूर / कोरपणा मोफत मोतीबिंदू नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २४७ नागरिकांची तपासणी, १८० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी...

मोफत मोतीबिंदू नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २४७ नागरिकांची तपासणी, १८० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर : लायन्स क्लब इंटरनॅशनल, महावीर इंटरनॅशनल तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत मोतीबिंदू नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न झाले. महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे पार पडलेल्या या शिबिरात एकूण २४७ नागरिकांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला. त्यामध्ये १२९ महिला व ११८ पुरुष रुग्णांचा समावेश होता. तपासणीदरम्यान १८० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून त्यापैकी ७० रुग्णांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले. उर्वरित रुग्ण येत्या २५ तारखेला शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल चीताडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. सतीश उपलेचवार यांनी केले तर शिबिराचे संचालन संचालक पुरुषोत्तम निब्रड यांनी केले. या वेळी महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमित वैद्य, तुषार डबली, देवेन वर्मा, विमल देसाई, निर्मल भंडारी यांच्यासह हरीश घोरे, महेश एकरे, माधव जयस्वाल, शिवाजी सेलोकर, महेश बाबू शर्मा, विश्वंभर झाम, महेश घरोटे, अरविंद डोहे, धनंजय छाजेड, विनय बद्दलवार, अरविंद कोरे, रमेश चुदरी, देविदास पेंदोर, जयंता भोंगळे, योगेश बांदुरकर, रवी कन्नाके, शंकर अपुरकर, विलास केवट, विजयालक्ष्मी डोहे, अपर्णा उपलेचवर, उमाताई कंठाळे, ज्योतिका हलदार आदी मान्यवर उपस्थित होते.

सेवाग्राम येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चमूने नागरिकांची तपासणी केली. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व मोफत नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश घरोटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here