लोकदर्शन.👉मोहन भारती
चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा निवड मंडळाची बैठक साई सेलिब्रेशन हॉल, चंद्रपूर🚼 येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा🚼 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी भूषविले. या वेळी माजी मंत्री व आमदार मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतीक्षाताई धानोरकर, जिल्हा प्रभारी मा. आ. श्री. अभीजीत वंजारी, तसेच अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज सादर केलेल्या इच्छुकांच्या अर्जांचा सखोल आढावा घेण्यात आला. उमेदवारांच्या कार्याचा अहवाल, सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क व संघटनात्मक निष्ठा या निकषांवर आधारित मुलाखती घेण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सज्ज असून पक्षाच्या संघटनशक्तीचा भक्कम प्रत्यय या बैठकीतून आला, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





