Home
Home Breaking News होली फॅमिली कॉन्व्हेन्ट येथे वृक्षारोपण संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

होली फॅमिली कॉन्व्हेन्ट येथे वृक्षारोपण संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदुर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एक झाड एक जीवन  या अभियाना अंतर्गत होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळा  गडचांदूर येथे विज्ञान  विभागातर्फे व अंबुजा  फाउंडेशन गडचांदूर यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक 24  ऑगस्ट 2024 रोजी  राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व अवगत करून त्यांचा सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी शाळेच्या परिसरात मोकळ्या जागेची निवड करून योग्य पद्धतीने खड्डे  तयार करण्यात आले. वृक्षारोपणासाठी  आंबा, सीताफळ, संत्री, गुलमोहर अशा 30 विविध झाडांचा समावेश करण्यात आला.  विद्यार्थ्यांना वनसंपदा पर्यावरण रक्षणाचे संवर्धन याबाबत प्रशिक्षण देण्याचे कार्य विज्ञान शाखा प्रमुख डॉक्टर नाझिया अली यांनी केले. या कार्यक्रमाचे विशेष सहभागी स्काऊट गाईडचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या परिश्रम व योगदानाबद्दल शाळेच्या प्राचार्य सिस्टर दीपा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्काऊट गाईड प्रशिक्षण अधिकारी भूषण मेडपल्लीवार सर व संतोष सर व शाळेचे स्काऊट गाईड चे प्रमुख आरती सातपुते हे उपस्थित होते त्यांनी वृक्षारोपणाची गरज व त्याचे फायदे व वृक्ष संवर्धन कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. वृक्षारोपणासाठी शाळेची उपप्राचार्य सिस्टर ब्लेसी मेरिया लोकल मॅनेजर सिस्टर नवीन गोष्टी सुद्धा उपस्थित होते. वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी सिद्धी का तसेच श्रुती यांनी वृक्षारोपणाची गरज याबद्दल विद्यार्थ्यांना चांगला संदेश दिला. सर्व प्रमुख पाहुणे विद्यार्थी व शिक्षण गण यांनी मिळून वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here